Price: ₹ 220.00
(as of Dec 02,2020 21:56:43 UTC – Details)


वाढत्या स्पर्धात्मक युगात सर्वांनाच सर्वोत्कृष्ट बनायचे आहे. त्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे, आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. तुम्हालाही सर्वोत्कृष्ट बनायचे आहे का? मग जॉन मेसन यांचे ‘सर्वोत्कृष्ट बनण्याचे सुपर पॉवरफुल मंत्र’ हे पुस्तक जरूर वाचा. ते तुम्हाला तुमच्या मर्यादा ओळखून त्यावर विजय मिळविण्यासाठी मार्गदर्शन करील. मेसन यांनी या पुस्तकात सांगितलेले १०१ विचाररत्न तुम्हाला अडचणींवर विजय मिळवायला, आयुष्यात नवी उंची गाठायला, तुमचे स्वप्न प्रत्यक्ष साकारायला अर्थात सर्वोत्कृष्ट बनण्यास निश्चित मदत करतील. हे पुस्तक तुम्हाला… • तुम्ही जे आहात तेच असण्याचे धाडस ठेवायला शिकवेल. • नेहमी हसायला आणि रागाला विश्रांती द्यायला शिकवेल. • तुम्ही पाहू शकता त्यापेक्षा पुढे जायला शिकवेल. संधीचे सोने करायला शिकवेल. • तुम्ही जितके वेळ खाली पडाल त्यापेक्षा एक वेळा अधिक उठायला शिकवेल. हे आणि असेच आणखी ९६ विचाररत्न या पुस्तकात आहेत. हे विचाररत्न तुम्ही अंगीकारल्यास तुम्हीही अमर्याद यश आणि आनंद मिळवू शकता. जॉन मेसन असंख्य बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक आहेत. यात अॅन एनिमी कॉल्ड अॅव्हरेज, यू आर बॉर्न ॲन ओरिजिनल – डोंट डाय अ कॉपी आणि लेट गो ऑफ व्हॉटएव्हर मेक्स यू स्टॉप या पुस्तकांचा समावेश आहे. ते इन्साइट इंटरनॅशनल या संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. ही संघटना लोकांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यास आणि विधिलिखित पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. अमेरिका आणि परदेशात जॉन मेसन यांना वक्ता म्हणून मोठी मागणी आणि लोकप्रियता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here